जळगाव – आज सकाळपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हिस्ट्रीशिटरची ओळख परेड घेतली. यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हिस्ट्रीशिटरची गर्दी पहावयास मिळाली.जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २० हिस्ट्रीशिटरची ओळख.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २० हिस्ट्रीशिटरची ओळख परेड घेण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शहर उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच हिस्ट्रीशिटरची ओळख परेड घेण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी धडक कारवाई करत गुन्हेगारांवर वचक बसविला आहे.
यावेळी कुमार चिंता यांनी शहरातील सर्व डीबी कर्मचाऱ्यांना बोलावून हिस्ट्रीशिटरची कानउघडणी केली. सर्वांना तंबी देण्यात आली. पुढील आठवड्यात जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींची ओळख परेड घेण्यात येणार आहे.