रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील विवरे येथील प्रगतशील शेतकरी सुनिल दामोदर पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
लवकरच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी दिली आहे.
सुनिल पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विवरे खु परिसरात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना ठिबक सिंचनाच्या आधारे कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यात ते अग्रेसर ठरतात. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रगतीची कास धरली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी असल्याने संस्थेने त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषिभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी कुषी .महसुल मंञी एकनाथराव खडसे मुक्ताईनगर व जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.