Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाची अधिकाऱयांनी केली पाहणी

खासदार उन्मेश पाटील यांचा पाठपुरावा

by Divya Jalgaon Team
November 21, 2020
in जळगाव
0
हिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाची अधिकाऱ्यानी केली पाहणी

चाळीसगाव –  हिरापुर येथे असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे काँक्रिटीकरण काम व्हावे, पर्यायी उपाययोजना करावी यासाठी हिरापुर रेल्वे पूल समन्वय समितीतर्फे खासदार उन्मेश पाटील यांना साकडे घातले होते.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तातडीने डी आर एम साहेबांशी बोलून याची त्वरीत दखल घेत रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण करून रहदारीसाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी अधिकाऱ्यांना समन्वय समिती सदस्यांशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सविस्तर चर्चा करावी. त्याचा रिपोर्ट मला द्यावा अशी मागणी केली होती. या अनुषंगाने आज रेल्वे अधिकाऱ्यानी पाहणी केली आहे.

हिरापुर, ब्राम्हणशेवगे, याबाबत सविस्तर माहिती अशी की हिरापुर,पिंपळवाड, तमगव्हाण, माळशेवगे, हातगाव, अंधारी, नाईकनगर, शेवरी इ.गावांचा एकमेव रहदारी मार्ग असल्याने या गावांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते होते..पावसाळ्यात   या भुयारी मार्गात पाणी साचून राहते.  रस्त्याचा अंदाज येत नसल्याने तसेच फरशीवरचे दगडही गुळगुळीत झाल्याने रेल्वे अंडर पास येथून प्रवास करणेही गावकऱ्यांना  धोक्याचे झाले होते.

पाणी साचून राहिल्याने विशेषत: पावसाळ्यात विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची हेळसांड होते. ही वस्तुस्थिती असून तातडीने रेल्वे अंडर पासची समस्या मार्गी लावावी असे आदेश वजा सूचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या.

आज दुपारी बारा वाजता रेल्वे भुयारी समस्येबाबत समन्वय समिती व रेल्वे अधिकारी यांनी पाहणी व सर्वेक्षण केले याप्रसंगी रेल्वेचे मंडळ अभियंता  पंचमसिग जाटम, सहाय्यक सेक्शन अभियंता एस.एस.केदार यांनी प्रत्यक्ष हिरापुर येथील रेल्वे भुयारी मार्ग पाहणी करून सर्वेक्षण केले.

याप्रसंगी  हिरापुर येथील भैयासाहेब पाटील, सरपंच सुधीर शिंदे, संता पहिलवान, अनिल कापसे, माजी सरपंच मधुभाऊ  शिंदे, भाईदास पाटील,पांडूरंग निकम, रंजनाताई आबा वराडे, अनिल माळे,नितीन माळे, एकनाथ  राठोड, सुभाष कापसे, ज्ञानेश्वर राठोड, अजय मोरे,लाला पठाण,  माळशेवगेचे  माजी सरपंच प्रताप पाटील, ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी,विष्णू राठोड, मनोहर पाटील  व समन्वय समिती सदस्य  आदी मान्यवर उपस्थित होते.

अजून वाचा 

खेल प्राधिकरणातून खेळांचा दर्जा उंचावणार – खा. उन्मेश पाटील

Share post
Tags: #HirapurChalisgaonDivya Jalgaon NewsJalgaonMarathi NewsMP Unmesh PatilRailway Bogdaहिरापूर येथील रेल्वे भुयारी मार्गाची अधिकाऱ्यानी केली पाहणी
Previous Post

भुसावळमधील अतिक्रमणधारकांचे तात्काळ पुनवर्सन करा – रिपाई (आ. गट)

Next Post

विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

Next Post
विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group