यावल- तालुक्यातील बोरावल खुर्द या गावात शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनगर समाजाच्या सभा मंडपाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील बोरावल खुर्द या गावात माजी आमदार स्व. हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या धनगर समाज सभा मंडपाच्या भुमीपुजनाचे शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील ,चोपडा आमदार लता चंद्रकात सोनवणे , चोपडयाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे , चोपडा पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील , रावेर येथील जिल्हा परिषद जळगावचे माजी शिक्षण समिती सभापती सुरेश पुना धनके, अमोल हरीभाऊ जावळे, धनगर समाजाचे अध्यक्ष हिलाल दौलत सोनवणे, अध्यक्ष रवींद्र वसंत कुवर , धनगर समाज नियोजन समितीचे बोलावल खुर्द प्रमुख हे या प्रसंगी उपस्थित राहणार आहे.