भुसावळ – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बळावत चालली आहे. म्हणून दोन टोळ्यांमधील गुन्हेगारांना हद्दपार करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने सुरू केली असून डीवायएसपी वाकचौरे यांनी त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.
भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेऊन सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याची तयारी पोलीसांनी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत थेट संपूर्ण टोळीलाच हद्दपार करण्यात येणार असून याचे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
अलीकडेच रूजू झालेले डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी थेट टोळ्यांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांची कुंडली पोलिसांनी काढली आहे. कायद्याचा आधार घेऊन अशा टोळ्यांचा बंदोबस्त केला जाणार आहे. यात अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणार्या दोन टोळ्यांचे प्रस्ताव हद्दपारीसाठी पाठविण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.