भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने भिलार येथील1 ‘पुस्तकांचे गाव’ या प्रकल्पाच्या माध्यमातून पुस्तकांची आणि वाचनाची आवड वाढवणारे उपक्रम योजण्यात आले आहेत.
‘चला वाचूया’मध्ये अभिवाचन अष्टक
वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने व्हिजन संचालित ‘चला, वाचूया’ उपक्रमाअंतर्गत येत्या 15 ते 22 ऑक्टोबर दरम्यान ‘अभिवाचन अष्टक’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सलग आठ दिवस दररोज सायंकाळी 5 वाजता आठ नामवंत अभिवाचक, आठ उत्तम साहित्यविषय घेऊन रसिकांसमोर येतील. ‘अष्टक’चा शुभारंभ 15 ऑक्टोबर रोजी लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या ‘इन्शाअल्लाह’ या कादंबरीतील काही अंशाच्या अभिवाचनाने होईल.
तर समारोप 22 ऑक्टोबर ज्येष्ठ लेखक-कवी आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्या अभिवाचनाने होईल. महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी youtube.com/VISIONvoicenact चॅनेल सबस्क्राईब करावे, असे आवाहन ‘व्हिजन’चे श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.