मुंबई – राज्यात दिवसभरात 19 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. दिवसभरात 10 हजार 552 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.71 टक्क्यांवर पोहोचले आहे. सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 158 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 78 लाख 38 हजार 318 नमुन्यांपैकी 15 लाख 54 हजार 389 नमुने पॉझिटिव्ह ( 19.83 टक्के) आले आहेत. राज्यात 23 लाख 80 हजार 957 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 176 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात 2211 कोरोना रुग्ण; 48 जणांचा मृत्यू
मुंबईत दिवसभरात 2211 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 3370 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 2 लाख 01,497 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 48 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 552 झाली आहे.