Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

OnePlus 8T लाँच; Apple च्या नव्या आयफोनना देणार टक्कर

जाणून घ्या किंमत

by Divya Jalgaon Team
October 15, 2020
in तंत्रज्ञान
0
new mobile lounch news

Apple ने आयफोन 12 ची सिरीज लाँच केल्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनची प्रिमिअम स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने OnePlus 8T स्मार्टफोन बाजारात आणला आहे. आता वनप्लसकडेही नव्या 5जी तंत्रज्ञानाचे तीन स्मार्टफोन झाले आहेत.

OnePlus 8T हा फोन वनप्लसचा पहिलाच 65 वॉट व्रॅप चार्ज तंत्रज्ञानाचा आहे. हा फोन 8जीबी+128जीबी आणि +256जीबी या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यापैकी 8 जीबी व्हेरिअंटची किंमत 42999 आणि 12 जीबीची किंमत 45999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा सेल 17 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

वनप्लस 8T मध्ये 1080×2400 पिक्सल रिझोलूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह फुल 6.55 इंचाचा एचडी प्लस फ्लॅट फ्लूइड डिस्प्ले देण्यात आला आहे. वनप्लसच्या या नव्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट देण्यात आला आहे. गेमिंगसाठी फोनमध्ये आधीच 285 टक्के मोठा वेपर चेंबर देण्यात आला आहे.

कॅमेरा
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 16 एमपीचा अल्ट्रावाईड अँगल लेंस, एक 5 एमपीचा मायक्रो सेन्सर आणि एक 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. गरज असेल तर नाईटस्केप मोड वापरता येणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

अँड्रॉईड 11 आऊट ऑफ दी बॉक्स देण्यात आली असून वनप्लसची त्यावर आधारित Oxygen OS 11 दिली आहे. यामध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले, बिटमोजी, लाइव वॉलपेपर ग्रुप जेन मोड सारखे फिचर देण्यात आले आहेत. बिटमोजीसाठी स्नॅपचॅटसोबत करार केला आहे.

बॅटरी
4500mAh ची बॅटरी देण्यात आली असून 65 वॉट व्रॅप चार्जमुळे 15 मिनिटांत संपूर्ण दिवसभर फोन सुरु ठेवण्यासाठी चार्जिंग होणार आहे. फोनचे वजन 188 ग्रॅम आहे.

Share post
Tags: AppleNew LounchOnePlus 8TSmartphoneToday
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा थैमान, 183 गावांना फटका

Next Post

राज्यात दिवसभरात 19,517 कोरोनामुक्त; 10 हजार 552 नवीन रुग्ण

Next Post
corona patient discharge

राज्यात दिवसभरात 19,517 कोरोनामुक्त; 10 हजार 552 नवीन रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group