Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा थैमान, 183 गावांना फटका

जीवितसह मोठी वित्तहानी, अनेक मार्ग बंद

by Divya Jalgaon Team
October 15, 2020
in राज्य
0
solapur district news

सोलापूर : गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोलापूर जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये काही जणांना जीव देखील गमावावा लागला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी लोक वाहून देखील गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत.

पंढरपुरात भिंत कोसळून सहा मृत्यूमुखी
काल दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तेथील कोळी समाजाने घेतली होती.

लोक वाहून गेल्याच्या घटना
पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. सावळेश्वर, ता. मोहोळ येथील शंकर देवकर यांच्यासह 4 जण पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तर बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील एक वृद्ध व्यक्ती नागझरी नदीत वाहून गेले आहेत. परिते, ता. माढा येथील एक व्यक्ती पाण्यात वाहून गेली असल्याची माहिती आहे. तर निमगाव, ता.माढा येथे एक कार वाहून गेली ज्यात तीन व्यक्ती होते, अशी माहिती आहे.

बार्शी तालुक्याला सर्वाधिक फटका
जिल्ह्यातील 183 गावांना पावसाचा मोठा तडाखा बसल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती आहे. एकट्या बार्शी तालुक्यातील 137 गावांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे कालपर्यंत 132 कुटुंबाना स्थलांतरीत केल्याची माहिती आहे. बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत काल कमरेइतके पाणी साचले होते. त्यामुळं जनजीवन विस्कळित झाले आहे. तसंच झोपडपट्टी परिसरात अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील एका 11 वर्षीय मुलाचा वीजेचा धक्का लागून मृ्त्यू झाला असल्याची माहिती आहे.

Share post
Tags: AttensionFarmFarmer LossRainSolapur NewsVillage
Previous Post

न्यूझीलंडचे माजी कर्णधार जॉन रीड यांचे निधन

Next Post

OnePlus 8T लाँच; Apple च्या नव्या आयफोनना देणार टक्कर

Next Post
new mobile lounch news

OnePlus 8T लाँच; Apple च्या नव्या आयफोनना देणार टक्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group