न्यूझीलंड – न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे माजी कर्णधार जॉन रीड यांचे बुधवारी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने याविषयीची माहिती दिली. त्यांच्या निधनाचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.
‘‘न्यूझीलंड क्रिकेटसाठी रीड यांनी दिलेले योगदान मौल्यवान असून त्यांचे नाव कायमच स्मरणात राहील. रीड यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी बळ द्यावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना,’’ असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य अधिकारी डेव्हिड व्हाइट म्हणाले.