मुंबई – अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सरचं निदान झालं. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून “कॅन्सरचा मी पराभव करेन” असं तो यात म्हणताना दिसतोय. हेअरस्टायलिस्ट अलिम हकिमने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
“मी सलूनमध्ये आलोय आणि नवीन
“मी सलूनमध्ये आलोय आणि नवीन हेअरकटसुद्धा करून घेतला आहे. जर तुम्हाला हे दिसत असेल तर, हा माझ्या आयुष्यातला नवीन डाग आहे, पण मी कॅन्सरचा लवकरच पराभव करेन”, असं तो या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. हेअरस्टायलिस्टबद्दल तो पुढे म्हणाला, “अलिम आणि माझी खूप जुनी ओळख आहे. त्याचे वडील माझ्या वडिलांचे केस कापायचे. रॉकी या चित्रपटासाठी हकिम साहब माझे स्टायलिस्ट होते आणि आता अलिम माझे केस कापू लागला आहे. कोणतीही नवीन हेअरस्टाइल करायची असेल तर तो मला बोलावतो.”
संजय दत्त ‘केजीएफ: चाप्टर २’मध्ये अधीराची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचंही त्याने या व्हिडीओत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं.
८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्याची भेट घेतली. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संजय दत्त लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.