जळगाव – शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणांवर होतांना दिसत आहे. याच पाश्र्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने शहरात जेएमपी मार्केटसह मनीष मार्केटमध्ये सुरू असलेले दोन जुगाराच्या अड्ड्यांवर वर धाड टाकण्यात आली आहे.
या धाडीत मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच यातील एक धाड धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या क्रीडा व सांस्कृतीक मंडळावर असल्याने या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना जेएमपी मार्केटमध्ये जुगाराचा हाय प्रोफाईल अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून त्यांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास येथे धाड टाकली .
यात बापु रघुनाथ सूर्यवंशी (वय ३८ रा. गेंदालाल मिल जळगाव), जुबेर फारुख खान (वय ३१ रा. मास्टर कॉलनी), नजीर शफी पिंजारी ( वय ५० रा, जूना कोळी पेठ जुने जळगाव), अब्दुल वाहेद अब्दुल रहेमान (वय ४४ रा. शनी पेठ ), शेख फय्याजोद्दीन कमरोद्दीन (वय ४३ रा. शनी पेठ), आबेदखान शबीर खान (वय ३७ रा. तांबापूर), अरमान रज्जाक पटेल (वय २८ रा. गेंदालाल मिल), मयुर संजय जगताप (वय २७ रा. व्दारका नगर ), परशुराम बन्सी चावरे (वय ४९ रा. वाल्मीक नगर जळगाव), सलीम शहा अब्बास शहा (वय ५५ रा. रथ चौक), तुषार नरेंद्र वरयाणी (वय ३९ रा. सिंधी काँलनी जळगाव), सुकदेव ज्योतीराम गवळी (वय ५१ रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) व पंकज शरद पवार (वय २८ रा. व्दारका नगर जळगाव) हे जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून १९ लाख ७० हजार ५०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तसेच धरणगाव येथील ज्ञानेश्वर भादू महाजन हे जुन्या बस स्टँडच्या मागील बाजूस असणार्या मनीष मार्केटमध्ये योगेश्वर क्रीडा व सांस्कृतीक मंडळाच्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती कुमार चिंथा यांना मिळाली होती. आज दुपारी या ठिकाणी धाड टाकण्यात आली .
ही कारवाई कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय येरुळे, पोनि भिमराब नांदुरकर, सपोनि रविंद्र बागुल, उपनिरीक्षक अरुण सोनार,उपनिरिक्षक चंद्रकात पाटील, कॉन्स्टेबल फुसे, उन्हाळे, प्रणेश ठाकरे, रतन गिते व पोना किशोर निकुंभ यांच्या पथकाने केली आहे.