पटना – बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-जेडी(यु)च्या एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. आज नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील मुख्यमंत्रीपदाची सातवी शपथ ठरली. त्यांच्यासह अन्य १४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जेडी(यु)च्या अन्य ५ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपतर्फे दोन उपमुख्यमंत्रिपदांसह एकूण ७ मंत्रिपद आली. बहुमताचा आकडा पार करण्यासाठी यंदा एनडीएची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. एनडीएला जादुई आकडा गाठण्यामध्ये यंदा हिंदुस्थान आवाम मोर्चा व विकासशील इन्सान पार्टीने मोलाची भूमिका बजावली आहे. यामुळे त्यांना देखील प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आलंय.
मंत्रिमंडळात जेडीयूचे नेते
विजय चौधरी
विजेंद्र यादव
अशोक चौधरी
मेवालाल चौधरी
शीला मंडळ
नितीश मंत्रिमंडळात सामील होणारे भाजप नेते
तारकिशोर प्रसाद- उपमुख्यमंत्री
रेणू देवी- उपमुख्यमंत्री
मंगल पांडे
रामप्रीत पासवान
अमरेंद्र प्रताप सिंह
जीवेश कुमार मिश्रा
रामसूरत राय
संतोष मांझी
मुकेश सहनी