जळगाव- जिल्ह्यातील प्रख्यात सुवर्णकार, प्रथितयश व्यवसायिक, गोसेवाप्रेमी तसेच शाकाहारचे प्रणेते श्री.रतनलालजी बाफना (वय – 86) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. ते प्रसिद्ध सुवर्णपेढी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे ते संस्थापक होते.
त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यासह देशातील विविध क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नयनतारा, भाऊ कस्तुरचंद, मुलगा सिद्धार्थ, सून, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे .
स्व. बाफनाजी शाकाहार व गोप्रेमी म्हणून प्रसिध्द होते. अतिशय दानशूर म्हणून राज्यभरात प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून दातृत्व असलेले व्यक्तिमत्त्व जाण्यामुळे सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, दलुभाऊ जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. स्व.बाफनाजी यांच्यावर कुसुबा गोशाळा येथे परिवाराच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.