Friday, May 22, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महिलांच्या सुरक्षेचा विभागच असुरक्षित

महिला व बालविकास मंत्र्यांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप

by Divya Jalgaon Team
May 22, 2026
in जळगाव, प्रशासन
0
महिलांच्या सुरक्षेचा विभागच असुरक्षित

जळगाव –  राज्यातील महिला सुरक्षा आणि कल्याणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला व बालविकास विभागातूनच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. विभागातील महिला अधिकारीच सुरक्षित नसल्याचे गंभीर आरोप आता उघडपणे करण्यात येत आहेत.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) खाजगी सचिव राजेश गायकवाड (Rajesh Gaikwad) यांच्यावर विभागातील महिला अधिकारी आणि राजपत्रित अधिकारी संघटनेकडून गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील आणि अपमानास्पद वर्तन करतात, मानसिक त्रास देतात, तसेच बदलीच्या नावाखाली आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. तडवी यांनीही गंभीर आरोप करत आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे विभागात मोठी खळबळ उडाली असून महिला अधिकाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, ज्या विभागावर महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच विभागात महिला अधिकारी असुरक्षित असल्याचा आरोप होत असल्याने प्रशासन आणि सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आता या प्रकरणात शासन आणि महिला व बालविकास विभाग काय भूमिका घेणार? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Share post
Tags: #AditiTatkare#BreakingNews#JalgaonNews#JusticeForWomen#MaharashtraNews#PoliticalNews#RajeshGaikwad#WomenAndChildDevelopment#धक्कादायक#महिला_अधिकारी#महिला_सुरक्षाJalgaon
Previous Post

जळगावातून ४५ वर्षीय व्यावसायिक गूढरीत्या बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group