Monday, May 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातून ४५ वर्षीय व्यावसायिक गूढरीत्या बेपत्ता

कामावर जातो” सांगून घराबाहेर पडले; मित्राकडून पैसे घेतल्यानंतर संपर्क तुटला

by Divya Jalgaon Team
May 18, 2026
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातून ४५ वर्षीय व्यावसायिक गूढरीत्या बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी – शहरातील शिवाजी नगर परिसरातील हमाल वाडा येथे राहणारे ४५ वर्षीय व्यावसायिक मोहन अंकुश चौधरी हे गेल्या दोन दिवसांपासून गूढरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी नंदा मोहन चौधरी यांनी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गहाळ झाल्याची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन चौधरी हे जळगावातील शिल्पा फर्निचर येथे सेल्समन म्हणून काम करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे “मी कामावर जातो” असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.

दरम्यान, दुपारी सुमारे १२ वाजता मोहन चौधरी यांचे मित्र सुधीर शिंदे यांनी त्यांच्या पत्नी नंदा चौधरी यांना फोन करून मोहन हे पैसे घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते व पैसे घेऊन निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोहन चौधरी यांचा कुठलाही संपर्क झाला नाही.

कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईकांकडे, रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच शहरातील विविध भागात शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर १८ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन
मोहन अंकुश चौधरी (वय ४५) हे घर क्रमांक ६४, हमाल वाडा, शिवाजी नगर, जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा रंग सावळा, शरीरयष्टी मध्यम, उंची सुमारे ५ फूट ६ इंच असून चेहरा लांबट आहे. केस काळे, नाक बारीक तसेच डोळे मोठे असून डोळ्यांचा रंग पिस्ता रंगासारखा आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी पिस्ता रंगाचा खादी शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्यांच्याकडे ८४४६३६८५७९ हा मोबाईल क्रमांक होता.
याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share post
Tags: #BreakingNews#FindMohan#JalgaonNews#MIDCPolice#MissingAlert#MissingPerson#MohanChaudhari#PoliceAppeal#ShivajiNagar#दिव्य जळगावन्यूज#मोहनचौधरी#हरवलेआहेजळगाव
Previous Post

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्ष पदी संध्या अश्विन कांकरिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group