Sunday, May 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव विधान परिषदेसाठी नंदू महाजन यांना भाजपची उमेदवारी

by Divya Jalgaon Team
May 31, 2026
in जळगाव, राजकीय
0
जळगाव विधान परिषदेसाठी नंदू महाजन यांना भाजपची उमेदवारी

जळगाव  – महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून, जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नंदकिशोर (नंदू) महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यातील विविध मतदारसंघांसाठी एकूण १० उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव विधान परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठी राजकीय चर्चा सुरू होती. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला होता. मात्र, अखेर महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार ही जागा भाजपकडे कायम राहिली आणि पक्षाने नंदू महाजन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथून , भंडारा-गोंदिया येथून , अमरावती येथून , सांगली-सातारा येथून , सोलापूर येथून , अहिल्यानगर येथून , छत्रपती संभाजीनगर-जालना येथून , नांदेड येथून , धाराशिव-लातूर-बीड येथून आणि जळगाव येथून यांचा समावेश आहे.

तसेच, नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर होताच जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध ठिकाणी समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. नंदू महाजन हे आज (१ जून) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी महायुतीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Share post
Tags: #BharatiyaJanataParty#BJPMaharashtra#BreakingNews#Election2026#JalgaonLive#JalgaonMLC#JalgaonNews#LocalBodyConstituency#MaharashtraNews#MaharashtraPolitics#Mahayuti#MarathiNews#MLCElection2026#NanduMahajan#NewsUpdate#PoliticalNews#TrendingNews#ViralNews#जळगावविधानपरिषद#नंदकिशोरमहाजन#नंदूमहाजन#महायुती#महाराष्ट्रराजकारण#राजकीयघडामोडी#विधानपरिषदbjpJalgaonजळगावभाजप
Previous Post

महिलांच्या सुरक्षेचा विभागच असुरक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group