Friday, April 24, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात फॅन्सी नंबर प्लेट व मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांचा बुलडोजर; १०० सायलेन्सर निकामी

by Divya Jalgaon Team
April 24, 2026
in गुन्हे वार्ता, जळगाव, प्रशासन
0

जळगाव – शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात जळगाव शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाई सुरू केली असून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत फॅन्सी नंबर प्लेट व कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर थेट रोलर फिरवत मोठी कारवाई करण्यात आली.

सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात एकूण १०० कर्कश आवाज करणारे दुचाकी सायलेन्सर तपासण्यात आले. तपासणीदरम्यान हे सायलेन्सर संबंधित कंपनीचे नसून वाहन खरेदी केल्यानंतर बाहेरून बसविण्यात आले असल्याचे आढळले. या सायलेन्सरमुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने पोलिसांनी ते जप्त केले होते.

तसेच शहरात अवैधरित्या लावण्यात आलेल्या सुमारे २५० फॅन्सी नंबर प्लेटही जप्त करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये आज या जप्त साहित्यावर रोड रोलर फिरवून त्यांना पूर्णपणे निकामी करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात ९३९ अपघात झाले असून त्यापैकी ४५० प्राणांतिक अपघातांमध्ये सुमारे ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

या मोहिमेत विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, अल्पवयीन चालक, रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, राँग साईड ड्रायव्हिंग तसेच कर्कश सायलेन्सर यांसारख्या प्रकारांवर विशेष कारवाई करण्यात येत आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही ही मोहीम अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कारवाईपासून बचाव करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जिल्हा ‘शून्य प्राणहानी’ करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समितीमार्फत जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी यावर भर देण्यात येत आहे.

Share post
Tags: #Jalgaon #JalgaonPolice #TrafficPolice #RoadSafety #ModifiedSilencer #FancyNumberPlate #TrafficAction #MaharashtraNews #PublicSafety #SafeDriving #HelmetRules #NoMoreNoise
Previous Post

नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांची महामार्गावर रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी

Next Post

बालचित्रपट महोत्सवातून मुलांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर दीपमाला काळे

Next Post

बालचित्रपट महोत्सवातून मुलांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर दीपमाला काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group