जळगाव, दि.२४ – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत पहिल्या क्वालिफायरमध्ये अमळनेर सुहांस जायंट्सने दमदार कामगिरी करत जळगाव कोगटा किंग्सने उभा केलेला २४२ धावांचा प्रचंड डोंगर सर करून थाटात ग्रॅण्ड फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी दुसरा संघ एलिमिनेटर व दुसऱ्या क्वालिफायरमधून निश्चित होणार असून, हा सामना दि. २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर खेळविण्यात येणार आहे.
🔥 ओम भोसलेची विक्रमी खेळी… तरीही पराभव
जळगाव कोगटा किंग्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ३ बाद २४२ धावा केल्या.
ओम भोसले याने ७४ चेंडूत तब्बल १७० धावा* (१० षटकार, १७ चौकार) करत एकहाती डाव उभा केला.
अक्षय मेघानी (२१), जितेंद्र नाईक (२०), बिपिन चांगरे (१३) यांनी साथ दिली.
💥 जायंट्सची तुफानी धावछळ
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अमळनेर सुहांस जायंट्सने केवळ १८.३ षटकांत ३ बाद २४६ धावा करत सामना जिंकला.
मानव ट्रिबरेवाल – ६४ (६ षटकार, ४ चौकार)
रणजीत निकम – ७६ (५ षटकार, ७ चौकार)
शुभम शर्मा – ६५ (३० चेंडूत)
या तुफानी फलंदाजीमुळे संघाने सहज विजय मिळवला. रणजीत निकमला सामनावीर पुरस्कार मिळाला.
⚔️ पाचोरा एसकेटी योद्धाजचा पराभव
लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्सने पाचोरा एसकेटी योद्धाजचा ६७ धावांनी पराभव केला.
शुभम शर्मा – ६९
अजय पाटील – ६९
१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना योद्धाज संघ १२९ धावांत गारद झाला.
सतीश चतुर्वेदीने ४ बळी घेत निर्णायक कामगिरी केली.
📌 पुढील सामना
👉 दुसरा क्वालिफायर – दि. २५ एप्रिल
👉 वेळ – दुपारी ४ वाजता
👉 ठिकाण – जैन ड्रीम स्पेसेस मैदान


