Monday, April 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पद्मालय विश्रामगृहात मनसेची निर्णायक बैठक

५००० हॉकर्सच्या हक्कांसाठी लढ्याचा इशारा

by Divya Jalgaon Team
April 13, 2026
in जळगाव, राजकीय
0

जळगाव (दिव्य जळगाव) – शहरातील हॉकर्सच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक येथे आयोजित करण्यात आलेली बैठक उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. या बैठकीत मनसे पदाधिकारी व नगरपथविक्रेता समिती सदस्यांनी एकत्र येत जळगाव शहरातील सुमारे ५००० हॉकर्स बांधवांच्या हक्कांसाठी ठोस लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या मनमानी व दादागिरीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हॉकर्स बांधवांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या असून, या कारवायांमुळे त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी अतिक्रमण विभागाची कार्यपद्धती, फेरीवाला समितीने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचना, शहरात अधिकृत हॉकर्स झोन निश्चित करण्याची गरज, तसेच हॉकर्सना सन्मानाने वागणूक देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हॉकर्सना कायदेशीर संरक्षण मिळावे व त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी लवकरच ठोस कृती आराखडा महापालिकेसमोर मांडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, शहरातील हॉकर्स बांधवांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मोठा मोर्चा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.

या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, नगरपथविक्रेता समिती सदस्य मोहन तिवारी, विशाल पाटील, दिनेश हिंगणे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, आशुतोष जाधव, विभाग अध्यक्ष खुशाल ठाकूर, शेतकरी सेनेचे प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक यांच्यासह हॉकर्स बांधव प्रतीक महाजन, लक्ष्मण दांडगे, विनोद पाटील, उमेश तळेले, विवेक महाजन, राजेश मराठे, संजय सोनार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीतून स्पष्ट संदेश देण्यात आला की, हॉकर्स बांधवांवर होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. त्यांच्या हक्कांसाठी मनसे रस्त्यावर उतरून लढा देईल आणि हॉकर्सना सन्मानाने व्यवसाय करता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Share post
Tags: #Hawkers Issue#Hawkers Protest#MNS Jalgaon#Street Vendors#अतिक्रमण विभाग#जळगाव बातमी#फेरीवाले#मनसे#महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर#हॉकर्स#हॉकर्स आंदोलन#हॉकर्स समस्याJalgaon newsजळगावजळगाव महापालिका
Previous Post

एमआयडीसीतील दुर्दैवी अपघात प्रकरण : महिला कामगाराच्या मृत्यूस २० लाखांची मदत द्या

Next Post

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई

Next Post

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group