Saturday, February 28, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

by Divya Jalgaon Team
February 28, 2026
in जळगाव, शैक्षणिक
0
राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

जळगाव – इकरा शिक्षण संस्था संचालित इकरा शाहीन उर्दू हाईस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन जनाब इरफान सालार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विज्ञानाविषयीची आपली आवड व कौशल्ये सादर केली. या प्रसंगी विद्यार्थिनी नमीरा शाह हिने भारताचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा आकर्षक वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर प्रभावी भाषणे सादर केली तसेच विविध वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित कार्यरत मॉडेल्सचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ‘मॅजिकल शो’ ठरले. विद्यालयाचे प्राचार्य रियाज शाह सर यांनी विज्ञानाशी संबंधित रंजक मॉडेल्स सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड अधिक वृद्धिंगत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिफ अंजुम सर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून काजी जमीर अशरफ, जाकिर बशीर, अतीक अहमद सर, मुमताज , यास्मीन, जावेद , मोहसिन ,जीशान आणि फरहान शेख उपस्थित होते. या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार , सचिव एजाज मलिक, अब्दुल रशीद शेख तसेच प्रो. जफर शेख आणि तारिक शेख यांनी शुभेच्छा देत विद्यालय परिवाराचे कौतुक केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

Share post
Tags: #iqra college#Science Day#राष्ट्रीय विज्ञान दिन
Previous Post

इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group