Saturday, February 28, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात

by Divya Jalgaon Team
February 28, 2026
in जळगाव, शैक्षणिक
0
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात

जळगाव – इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन उर्दू हायस्कूल येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवगीताने करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रभावी भाषणे तसेच सुंदर कविता सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेबद्दलचा अभिमान आणि जिव्हाळा स्पष्टपणे जाणवला.

भाषण व कविता स्पर्धेसाठी जावेद सर आणि अतीक सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करून निकाल जाहीर केला. स्पर्धेत शिजा शफीउल्लाह शाह हिने प्रथम क्रमांक, इरम शेख सलीम हिने द्वितीय क्रमांक तर नमीरा इलियास शाह हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थिनींसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मराठी विभागाच्या वतीने अनिसा शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाला शेख बरकत, मेहरुन्निसा खान, रिफत शेख , नूरजहां शिक्षक तसेच इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन मराठी फाऊंडेशनच्या उपशिक्षिका तरन्नूम शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली.

Share post
Tags: #iqra college#Marathi bhasha#मराठी भाषा
Previous Post

जळगावात ‘खान्देश महोत्सव २०२६’ची रंगत

Next Post

राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Next Post
राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group