जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रभाग क्रमांक १७ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेषतः १७ क मधील उमेदवार इब्राहिम पटेल आणि १७ ड मधील उमेदवार यांना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत असून, ते प्रभागात लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग १७ मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू असून, उमेदवारांनी घराघरांत जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रलंबित विकासकामे, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
इब्राहिम पटेल आणि अक्षय वंजारी यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातून पाठिंबा वाढताना दिसत आहे. “प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम, सुशिक्षित आणि सक्रिय नेतृत्वाची गरज आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रचार रॅली, पदयात्रा आणि कोपरा सभांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी उपस्थिती पाहता महाविकास आघाडीचे हे उमेदवार इतर प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे आव्हान उभे करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.


