Monday, January 26, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करा – भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांचे आवाहन

by Divya Jalgaon Team
January 7, 2026
in जळगाव, राजकीय
0
प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करा – भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांचे आवाहन

जळगाव – जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे स्पष्ट आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले आहे.

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात असून उमेदवारी अर्ज माघार प्रक्रियेनंतर महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत. कमळ, धनुष्यबाण व घड्याळ या चिन्हांवरील उमेदवार हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभाग क्र. १३ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून १३-अ गटातून सपके नितीन प्रभाकर, १३-ब गटातून सौ. तायडे सुरेखा नितीन हे उमेदवार असून १३-क गटातून सौ. पाटील वैशाली अमित यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३-ड गटातून देवकर प्रफुल्ल गुलाबराव हे अधिकृत उमेदवार आहेत.

दरम्यान, पक्षाने सूचना देऊनही काही इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असून, जणूकाही ते भाजपाचेच उमेदवार आहेत अशा पद्धतीने प्रचार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, अशा बंडखोर उमेदवारांनी येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर पक्षातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल.

या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रभाग क्र. १३ मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करावे.

Share post
Tags: #Nitin sapke#Praful Devkar#Surekha Tayde#Vaishali patil
Previous Post

प्रभाग १७ मध्ये इब्राहिम पटेल, अक्षय वंजारींना वाढता जनसमर्थन

Next Post

प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार

Next Post
प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार

प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस व दुबार मतदारांवर गुन्हे दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group