Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

by Divya Jalgaon Team
January 4, 2026
in जळगाव, राजकीय
0
आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक ७ मध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (दि. ४ जानेवारी) सकाळी १० वाजता करण्यात आला. या वेळी आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेश कॉलनी येथील गुरुदेव दत्त मंदिरात आ. राजूमामा भोळे आणि दिनकर गुरुजी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आ. भोळे यांनी शहरातील विकासाचा रथ कायम पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधील अ गटातून दीपमाला मनोज काळे, ब गटातून अंकिता पंकज पाटील, तर क गटातून विशाल सुरेश भोळे हे उमेदवार बिनविरोध निश्चित झाले आहेत. दरम्यान, ड गटातून चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रचाराच्या शुभारंभानंतर चंद्रशेखर अत्तरदे यांची श्रीकृष्ण कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, संत ज्ञानेश्वर कॉलनी, गणेश कॉलनी आदी परिसरांत प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

यावेळी उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे यांच्यासह माजी महापौर सीमाताई भोळे, माजी नगरसेवक जयश्री नितीन पाटील, मनोज काळे, माधुरी अत्तरदे, पंकज पाटील, सरचिटणीस चेतन तिवारी, सविता बोरसे, ऋषिकेश शिंपी, बंटी नेरपगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Share post
Tags: #Aa.Rajumama bhole#Amita Patil#chandrashekha rAtterde#Dipmala Kale#Rajumama bhole#Sima Bhole#Vishal Bhole#प्रभाग क्र ७प्रचाराचा शुभारंभ
Previous Post

उज्ज्वला बेंडाळे प्रभाग 12 ब मधून बिनविरोध ; भाजपाचे विजयी खाते उघडले

Next Post

विकसित जळगावसाठी महायुतीला साथ द्या – आ. रवींद्र चव्हाण

Next Post
विकसित जळगावसाठी महायुतीला साथ द्या – आ. रवींद्र चव्हाण

विकसित जळगावसाठी महायुतीला साथ द्या – आ. रवींद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group