Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उज्ज्वला बेंडाळे प्रभाग 12 ब मधून बिनविरोध ; भाजपाचे विजयी खाते उघडले

by Divya Jalgaon Team
December 31, 2025
in जळगाव, राजकीय
0
उज्ज्वला बेंडाळे प्रभाग 12 ब मधून बिनविरोध ; भाजपाचे विजयी खाते उघडले

जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने विजयी खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 12 ब (ओबीसी महिला) मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने बेंडाळे यांचा विजय सुनिश्चित झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा निकालाच्या दिवशी करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी (31 रोजी) छाननी प्रक्रिया पार पडली. महापालिकेतील सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही प्रक्रिया पार पडली. प्रभाग 12 ब मधून भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात वैशाली पाटील व भारती चोपडे या दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले होते.

छाननीदरम्यान भारती चोपडे यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्याने तो बाद करण्यात आला. तसेच वैशाली पाटील यांनी इतर दोन प्रभागांमध्येही अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दुसऱ्या प्रभागातील अर्ज आधी दाखल झाल्याने प्रभाग 12 ब मधील त्यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर यांनी बाद ठरविला. यामुळे प्रभाग 12 ब मध्ये केवळ उज्ज्वला बेंडाळे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपाला मतदानाआधीच एका जागेवर विजय मिळाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. 2 डिसेंबरपर्यंत माघारीची अंतिम मुदत असून, आणखी किती जागा बिनविरोध होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share post
Tags: #ection#jalgaon politiclebjp
Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशीलतेमुळे ७ वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय

Next Post

आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Next Post
आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group