जळगाव – प्रत्येक सणाचे आपले-आपले मत, महत्व आणि त्याचे असे एक सौंदर्य असते. जसे की पाडव्याच्या गुढी;साखरेच्या माळेनी गोड केली. गणपतीचे आगमन;मोदकाचा मानपान. घटाची स्थापना ;दुर्गेचे माहेरपण. असेच सगळे सण आपले कौतुक सांगतात. आणि या यांच्या वेगवेगळ्या रुपरंगांचे ,नाविन्यपूर्ण ओळख,आणि त्याच्या येण्याने उजळून जाणारी सकाळ ,त्यातून भासणारा हर्ष ;मनाला कोठून तरी सुख ,आनंद,हसण्याची आणि जिव्हाळ्याची फुंकर मारतो.
असे भासते की , पहाटेच्या साखर झोपेला आपण जसे मिठीतुन कधीच सोडत नाही, तिलाच बिलगून पण लाडिक तिच्या खुशीत घुसून झोपावे, अजून असे वाटावे अजून रात्र संपलेलीच नाही , आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्या खोलीचे दार वाजवावे आणि म्हणावे , ”उठा उठा सकाळ झाली ;मोती स्नानाची वेळ आली” आणि चक्क जागे होत़! आणि पाहतो , तर काय खरच बाहेर फटाके वाजतयात.
अहो, गोडीचा आणि समाधानाचा सण म्हणजे दिवाळी, आपुलकीचा सण म्हणजे दिवाळी, आनंदाचे वारे घेऊन येणार दिवाळीचा सण आपल्याला प्रत्येक दिवसाचे महत्व सांगत येतो.
आपल्या दारातलीच रांगोळी बोलते. क्षणभर या थोडे बसा, आणि आमचा फराळ खा. दिवाळी का करतात ?माहीत नसताना देखील तिची वाट पाहतात. सर्वजणांना आनंद हा असतो की , चला अआत्ता आम्हाला शाळेला सुट्टी भेटणार, हा आनंद गगनात मावत नसतो. फराळाची ओढ आणि सुट्टीची मजा खरेदीची धमाल, आपलेपणाच्या, जिव्हाळ्यांच्या लोकांच्या भेटी गाठी, वातारणातील आमुलाग्र बदल, दिवाळी नावाने भारावलेले गंधित तेजोमय, प्रकाशमय वलय याचा आनंद आहे “दिवाळी “. स्वप्नवत जागे करते ही दिवाळी. भारावलेल्या मनाने सुट्टीचा आंनद व्यक्त करण्यासाठी आकाश कंदिल, दिव्यांची आरास आणि दिवाळीच्या भेटलेला बोनस यामध्येच आनंद सामावत असतो दिवाळीचा.
सामाजिक कार्यकर्ते, समाजाविषयी जवळीकता, माणुसकी जपणारे जवळील गोर-गरीबांना मनस्वी आनंद देऊन दिवाळी बनवताना दिसतात, तेव्हा खरच त्यांचे कार्य बघून मन “दिन दिन दिवाळी” होऊन जाते.
सगळ्या झाडांना, फुलांना , पक्ष्यांना, वेलींना, रस्त्यानं भेटणाऱ्या वाठसरूंना आपल्या आनंदात सामावून घेत, रानात आपल्या कामात मग्न असणाऱ्या वाडीलधाऱ्यांना आपण साजरा करत असलेला दिवाळीचा आनंदात वाटेकरी बनवण्यात जे समाधान भेटते , ते असते दिवाळी !
जेवढे इंद्रधनुष्यत नसतील त्याहून अधिक रंग दिवाळीच्या आठवणीतल्या आणि जीवनातल्या दिवाळीत दडले आहेत. ज्याच्या, आठवणीत पुन्हा बालपण जागवायला, वाडीला लागलेल्या वेलीला देखील, थोडे खाली झुकवल,
अशीच आनंदाने भरलेली, उत्साहाने सजलेली, पंचपक्वनात नटलेली, येत असते घरी दिवाळी…
पण यानंतर येत असतो दिवाळीचा समारोप तन, मन, देह विव्हळणारा हा समारोपाचा क्षण….
प्रत्येक घरात दिवाळी निमित्त पाहुणे येतात पण ते जाण्यासाठीच येतात हि मनाची तयारी, पण घरातीलच सदस्य बाहेर गावी कामानिमित्त, शिक्षणानिमित्त असेल तेव्हा मात्र एक-एक पाखरे उडताना दिसतात, पुन्हा आपल्या कर्तव्यात, कामात रूजू होण्याकरिता, प्रत्येक घरातील असा सदस्य जो जबाबदारीवर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेला असतो.
दिवाळी साजरी करून निघण्याच्या तयारीलाच म्हणूया खरा “परतीचा प्रवास”.
परतीचा प्रवास…वाचली जरी एक साधीशी ओळ वाटली, तरी त्यामागे दडलेली भावना अगाध असते. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी परताव्या लागते—काहींचा प्रवास कर्तव्याकडे, काहींचा आपल्या मातीशी, तर काहींचा आपल्या अंतर्मनाशी असतो. शहरातील गगनचुंबी इमारती, जलदगती जीवन आणि व्यस्तता यामध्ये आपण स्वतःलाच विसरतो. स्वप्नांच्या मागे धावताना, एखाद्या क्षणी कुणीतरी मागून हाक मारते—“घरी ये…” ती हाक आईवडिलांची असो किंवा आपल्या भावनांची, हाच खरा परतीचा प्रवास सुरू होण्याचा क्षण.
गावातील ओळखीच्या पायवाटा, जुनं घर, वडाच्या झाडाखालील गप्पा, शेतात भिरभिरणारा वारा… या साऱ्यांना भेदून मन भावनिक होतं. पण आजूबाजूचे निसर्गरंग, मातीचा सुगंध आणि ओळखीचे चेहरे पाहून थकलेल्या मनाला नवी ऊर्जा मिळते.
परतीच्या प्रवासात आठवणींची शिदोरी घेत आपण दिवाळीच्या चार दिवसांना हात लावतो. खोड्या, मित्रांची दंगल, आजीची गोष्ट, दिवाळीचा सण… सगळं जणू नव्याने आठवणींच्या जगात जगायला सज्ज होतो, काही क्षणातच आपण किती बदललो, आणि वेळ कसा जोरात पुढे सरकला हे उमजतं.
पण परतीचा प्रवास फक्त आनंदाचा नसतो; तो विचार करायला लावणारा असतो. आपण कुठून आलो? काय मिळवलं? काय हरवलं? आणि पुन्हा निघताना सोबत काय घेऊन जाणार आहोत? कधी कधी परतणे म्हणजे स्वतःची पुन्हा ओळख करून घेणे असते. कारण आपल्या मुळांपासून जास्त काळ दूर राहिल्यावर मनातली पोकळी वाढत जाते. त्या पोकळीला भरून काढण्यासाठी लागतो—परतीचा प्रवास.
शेवटी, परतीचा प्रवास ही एक संधी आहे—माणुसकी, आपुलकी, आणि नात्यांचा धागा पुन्हा मजबूत करण्याची. व्यस्त जीवनातून क्षणभर थांबून आपल्या मातीला, संस्कृतीला आणि कुटुंबाला सलाम करण्याची!
चला मित्रांनो-मैत्रीणींनो कर्तव्य, काम, शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असताना काळजी घ्या..


