Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

सोन्याचे दागिने, डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय

by Divya Jalgaon Team
September 20, 2025
in जळगाव, व्यापार विषयी
0
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) – शहराच्या रिंगरोडवरील ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ अधिक भव्य स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येत आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर या नव्या शोरूमचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्यासाठी राजकारण आणि समाजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

गेली चार वर्षे ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ म्हणून चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या बाफना परिवाराने आता ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि मागणीमुळे सोन्याचे दागिने आणि डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपले पूर्वीचे शोरूम (गंगाई बिल्डिंग, रिंग रोड) सोडून, त्याच्या समोरच पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड येथे स्वतःचे नवे आणि प्रशस्त शोरूम सुरू केले आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर ते बुधवार दि. २ ऑक्टोबर (विजयादशमी) या कालावधीत ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:

यात माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खा. ईश्वरबाबूजी ललवाणी, उद्योजक अशोकभाऊ व ज्योती जैन, नयनताराजी बाफना, खा. स्मिताताई वाघ, पद्मश्री ॲड. खा. उज्ज्वल निकम, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी, ॲड. नारायण लाठी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने बाफना परिवाराने सोन्या-चांदीसोबत हिरे, पोल्की, जडाऊ, प्लॅटिनम आणि राशीरत्नांचे आकर्षक दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी या विशेष महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील कस्तूरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना आणि ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे.

Share post
Tags: #'हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्#Jalgaon RC bafna#हाऊस ऑफ ज्वेल्स
Previous Post

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये शाडूमाती गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात

Next Post

प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती

Next Post
प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती

प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group