Wednesday, December 3, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये शाडूमाती गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात

by Divya Jalgaon Team
August 26, 2025
in जळगाव, शैक्षणिक
0
अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये शाडूमाती गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात

जळगाव – अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतन या शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून श्रीगणेशाच्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचा उत्साही उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरण जागरूकता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरभाव वाढावा, लहान विद्यार्थ्यांनी आपल्या कोमल हातांनी मातीला विविध आकार देऊन सुंदर गणेश मूर्ती साकारल्या, ज्यामुळे लहानांमध्ये कलेची आवड जागृत या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणस्नेही मूर्तींचे फायदे समजावून सांगितले गेले. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी नैसर्गिक मातीचा वापर करून जल प्रदूषण थांबविण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मूर्ती रंगवणे, सजवणे आणि प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाने स्वतः घडवलेल्या मूर्ती अभिमानाने दाखवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकला.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ होते. हे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या गणेशोत्सवात या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. अनुभूती शाळा नेहमीच अशा मूल्याधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षित करत असते.

Share post
Tags: #Anubhuti English Medium School#school event#shree ganesh murti
Previous Post

यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात संपन्न

Next Post

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

Next Post
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

जळगावात 'हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्' चे सोमवारी भव्य उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group