Friday, March 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सृजनशील डॉ. केतकी ताई पाटील अभिष्टचिंतन – अमिता निकम

by Divya Jalgaon Team
August 7, 2025
in जळगाव, सामाजिक
0
सृजनशील डॉ. केतकी ताई पाटील अभिष्टचिंतन – अमिता निकम

सृजनशील डॉ. केतकी ताई पाटील अभिष्टचिंतन –
‘केतकीताई पाटील आदर, कृतज्ञता, कृतिशीलता यांचा संगम”।
सारीपाटावर नेतृत्वाचा होणारा उदय, सामजिक बांधिलकी जपत कृतिशिल विचारांची गतिमान शलाका 

आपल्या स्वतःच्या कल्पकता, जिद्द, चिकाटीच्या जोरावर, वडील मा. खासदार डॉ. उल्हास पाटिल यांचा संघर्षमय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा समर्थपणे पूढे नेत, शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारसंपन्न समाज विकासाचा ध्यास घेऊन जगणारे विचारशील संयमी, प्रसंगी आक्रमक कमी पण अभ्यासू जास्त असणारे, धडपड आणि नाविन्याची कास हे जणू त्यांच्या जीवनाचे काव्य बनून राहिले आहे.

आपल्या यशस्वी वातचलीने जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या क्षितीजावर शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या उत्साही व मनमिळाऊ स्वभावाने नवचैतन्य निर्माण करणाऱ्या. कार्यकुशल व कर्तव्यनिष्ठ, प्रेरणादायी, युवा नेतृत्व म्हजेच आमच्या गोदावरी फाऊंडेशन’ संचालित विविध शैक्षणिक शाखांच्या संचालिका तसेच भाजपा प्रदेशउपाध्यक्ष सन्माननिय डॉ. केतकीताई पाटील.

आजच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण होत असतांना, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात निर्मिती व सर्जनशीलतेला प्राधान्य देऊन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम, कौशल्यपूर्ण सक्षम पिढी घडवण्याचा उदात्त हेतू मनी बाळगून, नर्सरी, प्रायमरी पासून ते एम.बी.बी.एस. पर्यंतच्या गोदावरी फाऊंडेशन संचालित सर्व शाखांमध्ये शिक्षण , कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आप‌ला ठसा बळकट होतांना दिसून येतो ह्या यशामागे त्यांच्या ठायी असणाऱ्या विशेष नेतृत्व गुणांचा संदर्भ तसेच आईवडिलांचा समर्थ साथ, प्रेरणा, पाठबळ दिसून येते.

सामाजिक राजकीय वारसा जपणाऱ्या कुटुंबात जन्माला येऊनही कोणत्याही परिस्थिती मध्ये राजकीय बडेजावपणा अंगी न बाळगता नेहमी छान, अतिशय गोड, लाघवी स्मितहास्य चेहन्यावर ठेवत संयम, धैर्य, प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याचा आत्मविश्वास हा केतकीताई पाटील हयांचा स्वभावाचा निराळाच पैलू नेहमी आपणास पहायला मिळतो.

वडील मा. डॉ. उल्हास पाटील हयांचा मतदारसंघ हा बहु‌ग्रामिण असल्याने या ग्रामिण भागातील समाजाच्या आरोग्य, शैक्षणिक व इतर मूलभूत गरजांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी शालेय जीवनापासून घेतल्याचा दिसून येतो, कारण तारुण्यात अनेक प्रश्नांना त्यांनी अतिशय चोखपणे उत्तरे मिळवून दिली आहेत. त्यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा , त्यांच्यात निर्माण झाली व रुजली. आजतागायत सर्वांच्या सुखदुःखात, संकटसमयी मदतीचा हात पुढे करून सामाजिक उत्तरदायित्व केतकीताईसह सर्व कुटुंब नेहमी जोपासतात.

आईवडिलांनी रुजवलेल्या संस्कारांमूळे व आदर्श कौटुंबिक विचारांचा वारसा लाभल्यामूळे कोणत्याही हेव्यादाव्यांना बळी न पडता सर्वांना बरोबर घेऊन तितक्याच निष्ठेने हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव. प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रतेने संवाद साधून विश्वासाचे व जिव्हाळाचे संबंध प्रस्थापित करून तगडा जनसंपर्क त्यांचा तयार झालेला दिसतो. त्यांच्याठायी असणाऱ्या उत्तम संवाद, सुहास्य करीत आस्थेवाईकपणे केलेली कशी विचारपूस कौशल्य, अभ्यासपूर्ण निर्णय क्षमता, चिकित्सक विचारशैली व काठोकाठ भरलेला संयम यामूळे त्यांच्या यशस्वी जीवनाला व कार्याल वेगळी दिशा मिळाली आहे.

शेकडोच्या वर वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबिरे अन्नदान, चिकित्सेच्या माध्यमातून अनेक रोग्यांच्या आयुष्यात निरोगी काया पसरविण्याचा आशीर्वाद केतकीताईंच्या पाठिशी आहे व रहाणार हयात तिळमात्र शंका नाही.
“आतुरली मने साजरा करण्या वाढदिवस ताईचा,”
“बहरली मने दिन पहाण्या आजचा”
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजच्या हया मंगलदिनी आपल्या केतकीताई पाटील उत्तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या एका जबाबदार पक्षाच्या, जबाबदार पदावर आहेत. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत रहाणार याची आम्हाला खात्री आहे. वाढदिवसानिमित्त ताई तुमचे अभिष्ट चिंतन करतांना आजच्या ह्या शुभेच्छा देते की शिघ्रात शीघ्र तुमची प्रगती होऊन तुमच्या हातून लोकसेवा, जनसेवा घडो आणि ह्या सेवेसाठी सौ. डॉ. केतकीताई पाटील त्यांच्यासह सर्व पाटील कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभो.

सौ. अमिता निकम
व्याख्याता -( संहिता विभाग )डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव. Mob.- 8888096654

Share post
Tags: #dr.Ketkitai patil-godawary hospital jalgaon#godawary hospital#Ketki tai patil#Ketkitai Birthday Article by Amita Nikam
Previous Post

इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बियांपासुन तयार केल्या पर्यावरणपुरक राख्या

Next Post

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post
जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group