जळगाव – गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून व जि.प सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून आज जि.पी.एस मित्र परिवार तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराला प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
आज पर्यंत घेतलेल्या शिबिराांपैकी ह्या शिबिरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली असल्याचे पाहायला मिळाली. सकाळी 7 वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणी साठी गर्दी केली होती. सगळ्यांची अगोदर नोंदणी करून तपासणी करण्यात आली असून आज या शिबीर मध्ये 1510 रुग्णाची नोंदणी करून त्या पैकी 210 रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले तर उर्वरित 240 रुग्ण सोमवार 11 ऑगस्ट रोजी पाठविण्यात येणार आहे .
या शिबीर मध्ये रुग्णासाठी नाश्ता व जेवण ची सोय सुध्दा ठेवण्यात आली होती रुग्णांणकडून कुठलाच मोबदला न घेता सर्व सेवा मोफत करण्याचे नियोजन केले असून या करीता गुलाबराव पाटील , प्रतापराव पाटील, विक्रम पाटील हे सदैव प्रयत्नशिल असतात. अश्या या दृष्टी दान संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून प्रत्येक रुग्ण याबद्दल आभार ही व्यक्त करत आहे.
या शिबिर साठी शंकरा हॉस्पिटल ची पूर्ण टीम तसेच तालुका वैदकीय अधिकारी संजय चव्हाण डॉ. चंदन चौधरी डॉ.प्रशांत कोळी, डॉभुपेंद्र वाघ, डॉ. संदीप पाटील, डॉ.प्रीती पाटील, डॉ.सायमा खान, डॉ निळोफर शेख, अतुल ननावरे मेश्राम मॅडम व डॉ.राहुल चौधरी यांच्या सह पाळधी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी जि.पी.एस मित्र परिवार व शिवसेना युवासेना यांनी अपार मेहनत घेत शिबीर यशस्वी केला.


