जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांना तिरंगा राखी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमुळे विद्यार्थी व पालकांना एक सुंदर आनंददायी अनुभव मिळाला.
राखी बनवण्याच्या स्पर्धेचा उद्देश केवळ सर्जनशीलतेला चालना देणे नाही तर पालकांच्या हृदयात सांस्कृतिक जागरूकता आणि एकतेची भावना निर्माण करणे देखील आहे.या स्पर्धेमुळे, पालक आणि मुलांमध्ये एक छान नाते निर्माण होईल आणि मुलांना भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्त्व समजे असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.
राखी बनवण्याच्या स्पर्धेच्या यशाचे श्रेय उपशिक्षिका स्वाती नाईक यांच्या काटेकोर नियोजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या अढळ पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांची सर्जनशीलता आणि उत्साह दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले.
स्पर्धेनंतर, सर्वात सुंदर राखीची निवड संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी उत्कृष्ट राखीची निवड सर्जनशीलतेसाठी, कारागिरीसाठी आणि प्रतीकात्मक प्रतिनिधित्वासाठी केली. कार्यक्रम यशस्वी साठी शाळेच्या शिक्षिका शितल कोळी, उज्वला नन्नवरे, कविता सानप, रूपाली आव्हाड, सरला पाटील, सुवर्णा अंभोरे, शारदा तडवी यांनी परिश्रम घेतले.


