जळगाव – जळगाव येथील बॅरिस्टर निकम चौकाजवळ असलेल्या निवासस्थानी रविवारी दि. १३ जुलै रोजी अॅड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशन झाल्याच्या ऐतिहासिक आणि अभिमानाच्या क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अॅड. निकम हे देशातील नामवंत विधिज्ञ असून अनेक गंभीर आणि संवेदनशील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने यशस्वीपणे बाजू मांडून न्यायव्यवस्थेला नवा आधार देणारे कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे त्यांना न्यायाच्या आवाजाची दखल संसदेतही मिळवणार आहे.
यावेळी, अॅड. निकम यांच्या परिवारातील सदस्य त्यांच्या मोठ्या वाहिनी श्रीमती शैलजाताई दिलीप निकम आणि स्मिता प्रविण निकम , पुतणे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, रितेश निकम, सुन श्वेतांबरी निकम, भाचे अमर देशमुख तसेच मान्यवर यात – आमदार सुरेश भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उज्वला बेंडाळे, अमित भाटिया , भाजप पदाधिकारी व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.
फटाके फोडून आणि एकमेकांना पेढा भरवून सर्वांनी आनंद आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. अॅड. निकम यांच्या कार्याची आणि त्याच्या मेहनतीची ही पावती त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सदैव प्रेरणा देईल, अशी भावना सर्वांच्या मनात आहे.


