Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले निर्देश 

by Divya Jalgaon Team
May 6, 2025
in कृषी विषयी, जळगाव
0
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा

जळगाव – जिल्ह्यात आज रोजी मंगळवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारा पडल्याने काही तालुक्यांमध्ये शेती पिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या तक्रारी असून, अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत तसेच वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सध्या पालकमंत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे त्यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्य मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थित आहेत. त्यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

वादळी पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरे दगावली असल्यास अशा सर्व प्रकारच्या नुकसानीचा समावेश करून योग्य पद्धतीने पंचनामे करावेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, प्रशासनाकडून मदत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Share post
Tags: #farmar#shetkari#अवकाळी पाऊस#पालकमंत्री गुलाबराव पाटील
Previous Post

शासकीय आशादिप महिला वसतीगृहातील लक्ष्मी शिंदे बारावी उत्तीर्ण

Next Post

थॅलेसेमिया रुग्णांची राजेश्री श्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी

Next Post
थॅलेसेमिया रुग्णांची राजेश्री श्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी

थॅलेसेमिया रुग्णांची राजेश्री श्री शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group