Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय आशादिप महिला वसतीगृहातील लक्ष्मी शिंदे बारावी उत्तीर्ण

by Divya Jalgaon Team
May 5, 2025
in जळगाव, शैक्षणिक
0
शासकीय आशादिप महिला वसतीगृहातील लक्ष्मी शिंदे बारावी उत्तीर्ण

जळगाव  – शासकीय आशादिप महिला वसतीगृह, जळगाव येथील अनाथ विद्यार्थीनी लक्ष्मी विलास शिंदे हिने आपल्या जिद्दीच्या बळावर बारावीची परीक्षा यशस्वीरित्या पार केली आहे. बेंडाळे कॉलेज, जळगाव येथून आर्ट शाखेत शिक्षण घेत असलेल्या लक्ष्मीने 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण केली असून, तिच्या यशाबद्दल संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लक्ष्मीचा प्रवेश दिनांक 18 जून 2023 रोजी मुलींचे निरीक्षणगृह, जळगाव येथून शासकीय आशादिप महिला वसतीगृहात झाला होता. तिच्या जीवनात आई-वडील नसल्यामुळे ती व तिचे दोन छोटे भाऊही शासकीय संस्थांमध्ये राहत असून शिक्षण घेत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली लक्ष्मी शिक्षणाबरोबरच स्वावलंबी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.

पोलीस दलात भरती होण्याची तीव्र इच्छा असलेल्या लक्ष्मीला ब्युटी पार्लरचे शिक्षण घेण्याचीही आवड आहे. तिच्या या यशामागे शासकीय आशादिप वसतीगृहातील मार्गदर्शकांचे आणि कर्मचारीवर्गाचे मोठे योगदान आहे. परीवेक्षक अधिकारी सोनिया देशमुख यांनी देखील तिच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले आहे.

लक्ष्मी शिंदे हिचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्या स्वप्नांना गती मिळावी यासाठी सामाजिक स्तरावरून पाठबळ मिळण्याची गरज आहे.

Share post
Tags: #12th paas#Aasha vastigrah jalgaon#laxmi shinde
Previous Post

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

Next Post

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा

Next Post
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान : तातडीने पंचनामे करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group