Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप; जळगावातून 81 हजार जणांची विश्व शांती साठी प्रार्थना

by Divya Jalgaon Team
April 10, 2025
in जळगाव, सामाजिक
0
विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जळगाव  – ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी वस्तूंचा वापर, भारत दर्शन, सेंद्रीय शेती, हेल्दी लाईफ स्टाईल, योग व खेल कूद आणि गरिबांसाठी सहाय्य या नऊ संकल्पातून मानवतेसह सृष्टीचे संवर्धन करूया.!’ असा मोलाचा संदेश देत, विश्वात भारताचा प्रभाव जैन धर्मामूळे वाढला आहे. हे मी खात्री सांगू शकतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोगत व्यक्त केले.

जळगाव येथे जितो तर्फे आयोजित सर्व धर्मीय बंधू-भगिनींसाठी विश्व नवकार महासंमेलनामध्ये दिल्ली येथील विज्ञानभवनातून ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग नोंदविला. ‘विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नवकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया !’ या उद्देशाने विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र जप जळगावातील 81 हजार जणांनी एकाच वेळी केला. यात जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूडस् लि. कंपनीने संस्थात्मक स्तरावर ११ हजार सदस्यांची नोंदणी केली होती. जळगावस्थित मुख्य आस्थापनांमधील सहकाऱ्यांनी सामुदायिक नवकार मंत्राचे पठण केले. एकाच वेळी १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० ठिकाणी हा शांतीमंत्र गुंजला. जळगाव येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व धर्म बांधवांची उपस्थिती होती. यात महिला-पुरूष तसेच युवक-युवती व शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील घेताल सहभागी होते

खान्देश सेंट्रल मॉल येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर संघपती दलिचंदजी जैन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, रमेशदादा जैन, माजी आमदार मनिष जैन, डॉ. गुरूमूख जगवाणी, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, मुफ्ती हारून, मौलाना मुफ्ती खालीद नदवी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, शोभना जैन, डॉ. केतकी पाटील, मिनाक्षी जैन, नयनतारा बाफना, ॲड. सुशील अत्रे, श्रीराम पाटील, युसूफ मकरा, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, पवन सामसुखा, अनिल कोठारी, अजय गांधी, शशी बियाणी, अभिषेक राकेचा, राजेश जैन, ललित लोडाया, प्रविण पगारीया, JITO जळगावचे अध्यक्ष सुभाष लोढा, चीफ सेक्रेटरी प्रशांत छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन विनय पारख यांच्यासह जैन मुनी व सर्व धर्मीयांचे गुरू व प्रमुख व्यक्ति उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर मंगलमय नवकार मंत्राचे पठण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी देवश्री वैराग्यरत्न सागर सुंदरजी महाराज साहेब यांनी नवकार मंत्राच्या महिमेबद्दल माहिती दिली. सत्संगाच्या माध्यमातून पंच महाभूतांशी जोडण्याचा मार्ग म्हणजे नवकार मंत्र होय त्यासाठी कृतज्ञता भाव आवश्यक असल्याचे महाराज साहेब म्हणाले. अनुत्तर सागरजी यांनी सुद्धा जीनवाणी द्वारे नवकार मंत्र जप चे महत्त्व सांगितले.

विनय पारख यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत छाजेड यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी जीतो च्या सर्व पदाधिकारी व जैन समाज बांधवांनी सहकार्य केले.

Share post
Tags: #Social news Maharashtra#जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा गौरवjain irrigation
Previous Post

विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

Next Post

“सांसदचे काम संविधानानेच चालेल – संसदचे कायद्यानुसार नाही”

Next Post
“सांसदचे काम संविधानानेच चालेल – संसदचे कायद्यानुसार नाही”

"सांसदचे काम संविधानानेच चालेल – संसदचे कायद्यानुसार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group