जळगाव – ‘कुठलाही इतिहास हा शौर्य, पराक्रम, कठिणातून कठिण प्रसंगातही ध्येय कसे साधायचे, आपल्या जवळ जे आहे त्या संसाधनांमध्ये विजयश्री कशी मिळवावी हे शिकवतो.
त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र तशी पाहिजे.’ लेखन, ग्रंथ, गड, किल्ले, बुरुज, मंदिर हे इतिहासात घडलेल्या गोष्टी, घटनांचे आज ही साक्षीदार आहेत. ह्याच इतिहासात गुलामगिरीला झुगारून जनतेच्या प्रती असलेल्या आस्थेमुळे स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र हालअपेष्टा सहन करून स्वराज्यावरील प्रत्येक आक्रमणाला तोडीसतोड उत्तर देणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या शुर पराक्रमांची कहाणी ऐकली, बघितली तर आजही प्रेरणा मिळत असते.
या प्रेरणेतूनच स्वराज्य रक्षक आदर्श समाज घडावा, यासाठी शाळकरी मुलांना इतिहासातील बारकावे लक्षात यावे या हेतूने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन यांनी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्टार मल्टिप्लेस या अत्याधुनिक चित्रपट गृहामध्ये ‘छावा’ चित्रपटाची अनुभूतीच्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी असे एकून २६७ जणांनी एकाच वेळी तीन स्क्रीन वर छावा चित्रपट बघितला. यासाठी प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर, रूपाली वाघ यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


