जळगाव – चिंचोली येथील प्रसिद्ध असलेल्या श्री गिरीजा भवानी माता मंदिर यात्रा उत्सव बुधवारी पार पडणार असून या यात्रेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देत असतात.
दरम्यान यावेळी श्री गिरीजा भवानी माता ते चिंचोली रस्त्याच्या कामाचे उद्घाटन तसेच बारा गाड्या उत्सव सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती चिंचोली माता मंदिर उत्सव समिती तर्फे देण्यात आली असून चिंचोली गावातील सर्व ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन ही करण्यात आले.


