Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

फाईट व पुमसे मध्ये १३ गोल्ड, ६ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई

by Divya Jalgaon Team
February 5, 2025
in जळगाव, शैक्षणिक
0
दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव – दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश प्राप्त केले. पहिल्यांदाच एवढ्या पदकांची कमाई केल्याने अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

फाईटमध्ये विजयी खेळाडू म्हणून १४ वर्ष वयोगटाआतील मुलींच्या गटात ३५ किलो वजन गटात साची पाटील (सुवर्ण),४१ किलो वजनगटात समिक्षा पवार, ४७ किलो वजन गटात अनुभूती चौधरी (रौप्य), भव्या अग्रवाल, २६ किलो वजन गटात सन्निधी राकीबे (कांस्य), ३८ किलो वजन गटात चार्वी शर्मा, यादनी मोहिते विजयी ठरले. १७ वर्ष वयोगटात ४६ किलो वजन गटात भाविका पाटील (सुवर्ण), ४९ किलो वजन गटात समृद्धी कुकरेजा,५२ किलो वजनगटात दिया देशपांडे, ५९ किलो वजनगटात जानव्ही जैस्वाल, ६३ किलो वजन गटात पलक सुराणा, ६८ किलो वजन गटात अलफिया शाकिर, ६८ किलोवजन गटात अदिती कुकरेजा, ३८ किलो वजन गटात स्तूती गर्ग (रौप्य, किंजल धर्मशाली, ४६ किलोवजन गटात मुक्ती ओसवाल,५९ किलो वजन गटात शाहनी जैन विजयी झालेत.

पुमसे मध्ये वैयक्तीक प्रकारात १४ वर्ष वयोगटात अनुभूती चौधरी सुवर्ण, समिक्षा पवार (कांस्य) तर सांघिकमध्ये अनुभूती चौधरी, समिक्षा पवार, साची पाटील यांनी सुवर्ण पदक पटकाविले. १७ वर्ष वयोगटात वैयक्तीक प्रकारात समृद्धी कुकरेजा सुवर्ण, दिया देशपांडे (कांस्य) तर सांघिक मध्ये समृद्धी कुकरेजा, दिया देशपांडे, पलक सुराणा यांना सुवर्ण पदक मिळाले. पुमसे प्रकारात १४ वर्ष आतील वयोगटात अनुभूती चौधरी उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. तर १७ वर्ष वयोगटात समृद्धी कुकरेजा उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजयी ठरली. प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजयी खेळाडूंना जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, राज्य तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Share post
Tags: #Anubhuti Residential School#Ashok bhau jain#Nisha Jain#अनुभूती निवासी स्कूल
Previous Post

नाभिक कलादर्पण संघाच्या तृतीय साहित्य संमेलनाचे जळगावात शनिवारी आयोजन

Next Post

सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

Next Post
सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

सुरज  नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ जळगाव जिल्हा जनसंपर्क संपर्कप्रमुख पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group