Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नाभिक कलादर्पण संघाच्या तृतीय साहित्य संमेलनाचे जळगावात शनिवारी आयोजन

भगवान चित्ते संमेलनाध्यक्षपदी तर प्रा. डॉ. चटपल्ली करणार उद्घाटन

by Divya Jalgaon Team
February 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
नाभिक कलादर्पण संघाच्या तृतीय साहित्य संमेलनाचे जळगावात शनिवारी आयोजन

जळगाव –  महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवार, दि.८ फेब्रुवारी रोजी साईलिला सभागृह, शिरसोली रोड येथे होत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या एकदिवसीय साहित्य संमेलनात सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयावर विचारमंथन होणार असून २ परिसंवाद, १ कवी संमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराचा यात समावेश आहे, अशी माहिती आयोजकांनी बुधवारी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दिली.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे उपाध्यक्ष मुकुंद धजेकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे, राजकुमार गवळी उपस्थित होते.नाभिक समाजात अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंत आहेत. परंतु त्यांना हक्काचे स्थान मिळत नसल्याने ते प्रकाशात येत नाहीत. परिणामतः त्यांची प्रतिभा दडून राहते. समाजातील अशा या सर्व प्रथितयश आणि नवोदित साहित्य, कलाप्रेमी आणि लोककलावंतांना हक्काचे स्थान मिळावे या सार्थ हेतूने महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची स्थापना २०१९ मध्ये करण्यात आली. संघातर्फे प्रथम साहित्य संमेलन अमरावती येथे ९ नोव्हेंबर २०१९ ला तर द्वितीय साहित्य संमेलन शेगाव येथे ८ मार्च २०२२ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. आता हे तिसरे साहित्य संमेलन जळगाव येथे होऊ घातले आहे.

शनिवारी आयोजित तृतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक तथा नाभिक मंच संपादक, धुळे येथील भगवान चित्ते यांची तर, उद्घाटक म्हणून बंगळूरू येथील प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली (माजी उपकुलगुरू, कर्नाटक राज्य ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी, गदग, कर्नाटक) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव) हे असून प्रमुख अतिथी म्हणून सयाजी झुंजार (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), रितेश सेन (आमदार, वैशाली नगर, छत्तीसगड), मनोज महाले (उपसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मुंबई) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रादरम्यान साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. तसेच अनेक साहित्यिकांच्या काव्यसंग्रहाचे आणि साहित्यकृतीचे प्रकाशान मंचावरून केले जाणार आहे.

Share post
Tags: #Maharashtra Nabhik Sahitya Kaladarpan Sangh#Maharashtra Nuclear Corporation District President Ravindra NerapgareNabhik Samaj
Previous Post

हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट चे पंधरा विद्यार्थ्यां शासकीय सेवेत रुजू

Next Post

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

Next Post
दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group