Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ. भोळे

श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम, भारत माता पूजन

by Divya Jalgaon Team
October 17, 2024
in Uncategorized
0
भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ. भोळे

जळगाव – आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. भारत देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे अनेक देशांनी अनुकरण केले आहे. तसेच, भारतमातेचे पूजन व संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी दि. १२ रोजी केले. यावेळी त्यांनी विजयादशमीच्या जळगावकरांना सदिच्छा दिल्या.

जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम पूजन व भारत माता पूजन शनिवारी दि. १२ रोजी प्रशस्त महानगरपालिकेच्या इमारतीखाली करण्यात आले होते. कार्यक्रमात भवानी मंदिरचे महाराज महेश त्रिपाठी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसंच ध्वजाचे पूजन करण्यात आले. महाआरतीनंतर घोषणा देण्यात आली आणि दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय गांधी यांनी यशस्वी आयोजन केले. सूत्रसंचालन डॉ.अश्विनीकुमार काळुंखे यांनी केले. या कार्यक्रमात भवानी मंदिरचे महाराज महेश त्रिपाठी, तपस्वी हनुमान मंदिरचे महंत बालकदास महाराज, खा. स्मिताताई वाघ, शहराचे आ. राजूमामा भोळे, उद्योगपती श्रीराम पाटील, रोहित निकम, भाजपा महानगरअध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, माजी नगरसेवक अमित भाटिया, दीपक जोशी, आरएसएसचे महेश चौधरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन विनोद बियानी, युवा सेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी, राष्ट्रीय सेवा संघ संघाचे अनेक कार्यकर्ते, विविध मार्केटचे व्यापारी, पदाधिकारी तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share post
Tags: #Raja Shree Nehru Chowk Mitra Mandal of Jalgaon#Social activities news Rajumama bhole#आ. भोळे
Previous Post

कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती

Next Post

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

Next Post
डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group