Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील - मंत्री गुलाबराव पाटील

by Divya Jalgaon Team
September 15, 2024
in जळगाव, सामाजिक
0
भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

पाळधी/धरणगाव जळगाव – शाळा घरापासून लांब असल्याने पायपीट करणाऱ्या 500 विद्यार्थिनींना भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे आज पहिल्या टप्प्यात सायकल वाटप करण्यात आले. गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आमच्या मुलींमध्ये स्किल आहे, पुढे जाण्याची क्षमता आहे. म्हणून आम्ही सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला. या सायकलीमुळे शिक्षणात मदत तर होईलच त्या सोबत आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर डॉ. प्रा. प्रीती शिंदे यांनी सांगितले की, दिलेली सायकल ही केवळ साधन नसून स्वप्नांना दिलेलं बळ आहे. गुलाब भाऊंचे हे कार्य मतांसाठी नसून त्यांच्या मनातील इच्छा प्रत्यक्ष कृतीत आणत आहे. असे मत प्रा. डॉ. प्रीती शिंदे यांनी व्यक्त केले. ते पाळधी येथील सुगोकी लॉन येथे भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन व मुंबईचे जय बालाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रा. डॉ.प्रीती शिंदे पुढे म्हणाल्या की, असणे म्हणजे अस्तित्व आहे. यामुळे दिसण्यापेक्षा असण्यावर महत्व द्या. सायकलच्या वेगासोबत गुणवत्तेच्या व विचारांचा वेग वाढवा. पालकांनी मुलींना समानतेची वागणूक द्या. मुलगी ही देवाने दिलेली दौलत आहे. या दौलतीचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी मुली व त्यांच्या पालकांना केले. तसेच संस्कार, स्त्री, बाई व आईचे महत्व सविस्तरपणे विषद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी मुलींना मोफत सायकल वाटप बाबतचे महत्त्व विशद करून. मतदार संघात 1300 मुलींना सायकल वाटपाचे उदिष्ट पूर्ण करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्राचार्य नरेंद्र मांडगे यांनी केले तर आभार शाळेचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले. यावेळी बालाजी ग्रुपचे जनरल मॅनेजर मनिष कर, उपाध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
मुंबई येथिल जय बालाजी ग्रुपचे जनरल मॅनेजर मनिष कर, उपाध्यक्ष लालासाहेब गायकवाड, पालकमंत्री यांचे खाजगी अशोक पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील, नरेंद्र सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जनाआप्पा कोळी, साहेबराव वराडे, देविदास कोळी, संदीप सुरळकर, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, मोतीआप्पा पाटील, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, डॉ. कमलाकर पाटील, दिलीप आगिवाल, भारती चौधरी, सुनिता पाटील, समाधान चिंचोरे, जितू पाटील, वासुदेव कोळी यांच्यासह सरपंच, पदाधिकारी, व पालक – मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

ठळक वैशष्ट्ये
*विविध शैक्षणिक संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले होते.
*नोंदणीसाठी विविध स्टॉल लावले होते.
*मुलींची संख्या लक्षणे असून विविध गणवेशात उपस्थित होत्या
*परिसरात संपूर्णपणे शैक्षणिक वातावरण होते
*गुलाबभाऊ व प्रीती ताईंच्या भाषणाने मुली मंत्र मुग्ध झाल्या होत्या.

Share post
Tags: #Bhauso Gulabrao Patil Foundation#पालकमंत्री गुलाबराव पाटीलGulabrao Patil
Previous Post

संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथील वृद्धांच्या हस्ते महाआरती

Next Post

वैद्यकीय-अभियांत्रिकीत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश क्लासेस देणार मदतीचा हात..!

Next Post
वैद्यकीय-अभियांत्रिकीत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश क्लासेस देणार मदतीचा हात..!

वैद्यकीय-अभियांत्रिकीत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश क्लासेस देणार मदतीचा हात..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group