धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भवरखेडे येथील तरुणांनी स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
भवरखेडे येथील अनेक तरुणांनी आज पाळधी येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील देखील उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांचा तडाखा पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया या तरुणांनी दिली.
या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !
भवरखेडे येथील मयूर पाटील, खुशाल पाटील, समाधान पाटील, कल्पेश पाटील, भारत पाटील, जिभू पाटील, रोशन पाटील, श्रावण पाटील, निबा पाटील, भूषण पाटील, राजू पाटील, प्रकाश पाटील, सोनू महाजन, शाम महाजन, विजय सूर्यवंशी, सुनील धोबी, उमेश पाटील, अधिकार पाटील, कल्पेश पाटील, कांतीलाल पाटील, पंकज पाटील, शकील पिंजारी, पंकज बोरसे, योगेश पाटील, अमोल ब्राह्मणे, अक्षय ब्रह्मणे, ललित चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.