जळगाव – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली सेनेगल व मंजरी फाऊंडेशन राजस्थान येथील पाहुण्यांच्या हस्ते जैन हिल्स परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जैन हिल्स च्या गुरूकूल पार्किंगजवळ आफ्रिकेतील पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. सूक्ष्मसिंचनासह प्रगत तंत्रज्ञानातून शेती बाबतचे ज्ञान घेण्यासाठी एका विशेष ट्रेनिंग जैन हिल्सच्या गुरुकूल सुरु आहे त्यात त्यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपणावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. बी. डी. जडे, राजेश आगीवाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, अशोक चौधरी, जैन इरिगेशनचे अजय काळे, मनोहर बागुल, संजय सोन्नजे, रोहित पाटील, हर्षल कुळकर्णी उपस्थित होते.
जैन फूडपार्क मध्येसुद्धा पर्यावरण दिवस साजरा केला गेला. जैन व्हॅलीमध्ये टि.यू.व्ही.नॉर्डचे ऑडिटर गिरीश ठुसे यांच्या प्रमूख उपस्थित वृक्षारोपण झाले. यावेळी सुनील गुप्ता, बालाजी हाके, वाय. जे. पाटील, जी. आर. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. फायर सेफ्टी विभागाचे कैलास सैदांणे व सहकारी पंकज लोहार, निखिल भोळे, मनोज पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.