Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात मे महिन्यात ५१ महसूली मंडळात होते सलग ४५ अंश तापमान

५१ महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार ४३ हजारांची भरपाई !

by Divya Jalgaon Team
June 9, 2024
in जळगाव, राजकीय
0
जिल्ह्यात मे महिन्यात ५१ महसूली मंडळात होते सलग ४५ अंश तापमान

gulabrao patil

जळगाव प्रतिनिधी – यंदाचा उन्हाळा अतिशय कडक होता. यंदा मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जण अती तापमानाने हैराण झाले होते. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. केळी उत्पादकांना अती तापमानात जर सलग तीन दिवस ४५ अंश तापमान राहिले तर त्यांना नुकसान भरपाई शासन देते. यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळे पात्र ठरली आहे. सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत.

या आधी एप्रिल महिन्याच्या जास्त तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडळ पात्र ठरले होते. तर कमी तापमानाच्या निकषात ३६ महसूल मंडळ २६ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.

पात्र महसूल मंडळे अशी
जळगाव तालुक्यातील असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा. भडगाव तालुक्यातील भडगाव, कोळगाव. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बू., शिरसगाव. धरणगाव तालुक्यातील धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल तालुक्यातील एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह. अमळनेर तालुक्यातील अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे. पाचोरा तालुक्यातील कु-हाड बु., पाचोरा. पारोळा तालुक्यातील बहादरपूर, पारोळा,शेळावे, तामसवाडी.भुसावळ तालुक्यातील वरणगाव, चोपडा तालुक्यातील चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर. जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी बु., शेंदुर्णी. मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हे, मुक्ताईनगर. रावेर तालुक्यातील ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., रावेर, सावदा.

यंदा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. विशेष करुन एप्रिल व मे महिन्यात तापमान प्रचंड वाढले. मे महिन्यात तापमान ४५ अंशापर्यंत गेल्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. केळीचे नुकसान झाले. सलग पाच दिवस तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील ५१ महसुल मंडळ हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत जास्त तापमानाच्या निकषात पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसुल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे.-

ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा

Share post
Tags: #Agricultural#April Heat#Palakmantri Gulab rao patil#Temptureशेतकरी
Previous Post

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध !

Next Post

निधी अभावी राज्यातील ६४ हजार कोटी च्या रस्ते विकासाची कामे ठप्प

Next Post
निधी अभावी राज्यातील ६४ हजार कोटी च्या रस्ते विकासाची कामे ठप्प

निधी अभावी राज्यातील ६४ हजार कोटी च्या रस्ते विकासाची कामे ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group