Sunday, November 30, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

निधी अभावी राज्यातील ६४ हजार कोटी च्या रस्ते विकासाची कामे ठप्प

by Divya Jalgaon Team
June 18, 2024
in जळगाव, राजकीय
0
निधी अभावी राज्यातील ६४ हजार कोटी च्या रस्ते विकासाची कामे ठप्प

जलगांव – राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदार यांनी केलेल्या कामांची २० हजार कोटी रुपयांची देयके गेल्या सहा महिन्यांपासून शासन स्तरावर अडकली असून ही बिले अदा करण्यात शासन स्तरावरून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. शासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे कंत्राटदारांच्या कुटुंबाची मोठी आर्थिक परवड होत आहे.

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर्षी बजेटमध्ये फक्त १८ हजार कोटींची तरतूद असतांना जवळपास ६४ हजार कोटींचा कामांना १७ मार्चपर्यंत मंजुरी देऊन त्यांच्या निविदासुद्धा पूर्ण केल्या आहेत.
शासनाने मंजूर केलेल्या या कामामध्ये जिल्हा, राज्य व ग्रामीण मार्ग यांची दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे तसेच रस्त्यातील खड्डे भरणे तसेच राज्यातील प्रमुख शहरे व तालुका तसेच ग्रामीण भागामधील इमारती दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती या सर्व कामांचा यात समावेश आहे.
शासन स्तरावर देयके अडकून आजमितीस जवळपास ६ महिने जाले. सार्वजनिक बांधकाम व अर्थ खाते यांच्यातील बेबनाव व चुकीची कार्यपद्धती यामुळे कंत्राटदार यांचे मात्र घालमेल होत आहे.

कंत्राटदार यांनी आपला सगळा पैसा टाकून शासनाची विकासाची कामे केली. परंतु त्यांच्या केलेल्या हक्काच्या घामाचा पैसा मिळतच नाही. बँकेतील त्यांचा खात्यावरील सर्व रक्कम कामे करण्यासाठी खर्च केल्याने त्या खात्याचे व्याज भरायला सुद्धा आता कंत्राटदार यांच्या खिशात पैसेच नाही. यामुळे कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे सर्व घटक, त्यांचे कुटुंब यांची उपासमार होत आहे.

शासनाची ही उदासीनता कंत्राटदार व सर्व घटक सहनच करू शकत नाही. त्यामुळे कंत्राटदार यांची देयके देन्याबाबत सार्वजनिक बांधकाम व अर्थ खाते यांनी जर निर्णय न घेतल्यास जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना ग्रामीण, तालुका आणि जिल्हास्‌तरावर मोठे आंदोलन करेल असा इशारा शासकीय कंत्राटदार संघटना जिल्हा अध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिला आहे.

तसेच कंत्राटदारांची बिले देण्यात यावी यासाठी २० जून रोजी जळगाव जिल्हा कार्यकारी अभियंता पी. पी सोनवणे यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच २७ जून पासून काम बंद आंदोलन व उपोषणही करन्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांनी दिला आहे.

Share post
Tags: #Contractor#PWD App'#कंत्राटदार#सार्वजनिक बांधकाम विभागRahul Sonwaneआंदोलन
Previous Post

जिल्ह्यात मे महिन्यात ५१ महसूली मंडळात होते सलग ४५ अंश तापमान

Next Post

ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

Next Post
ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group