जळगाव- उत्तर महाराष्ट्र स्टुडंट कौन्सिलचे मा. चेअरमन मनोज दयाराम चौधरी यांनी संशोधकांचे भवितव्य अंधारात असल्याने तसेच जबाबदारी पेलवत नसेल तर प्र- कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, असे आशयाचे निवेदन कुलगुरूंना दिले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, विद्यापीठाने पेट परीक्षेचा फॉर्म भरण्याची मुदत २४-४-२०१९ ते २०-५-२०१९ अशी जाहीर केली. विद्यापीठाच्या पी एच. डी साठीच्या २२-११-२०१८ या नियमावलीनुसार परीक्षा घेण्याआधी मार्गदर्शकाची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होती, परंतु ती मार्गदर्शकांची यादी विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ असमर्थ ठरले, त्यानंतर १-६-२०१९ ला हॉलतिकीत मिळणार होते व परीक्षेची तारीख ९ ते १२ जून होती, परंतु विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी न झाल्याने नेट-सेट परीक्षा असल्याच्या नावाखाली परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या अखेरीस प्रसिद्ध करतील असे विद्यार्थ्यांना कळवले.
जून २०१९ अखेरीस विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही आणि परीक्षा १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली. तसेच संशोधकांच्या संशोधनाचा विषय आणि पीएचडी कोर्स वर्क २०२२ मध्ये पूर्ण होईल का? असा प्रश्न पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी आपण कोरोनाची स्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा विषय त्वरित मान्यता द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन सुरू करता येईल, तसेच कोर्स वर्क व त्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी व पीएचडी प्रक्रियेला गती द्यावी.


