अमळनेर (प्रतिनिधी) – येथील जळगाव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी ५ वाजेला करण्यात आले.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्याआधी स्टेशन रोड, कोर्टाच्यासमोर आई तुळजा भवानी, छत्रपती शिवराय आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील आणि डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाट्न सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापुसो.बी के सूर्यवंशी, शहाराध्यक्ष मनोजबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )सचिनभाऊ पाटील, शहराध्यक्ष श्यामभाऊ पाटील, तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, शेतकरी नेते सुभाष जिभाऊ पाटील,माजी नगरसेवक दादा पवार, प्रताप भाऊ शिंपी,संदीप घोरपडे,बाळासाहेब पाटील,युवा नेते गुड्डूभाऊ देशमुख, गोकुळ आबा बोरसे, जेष्ठ शिवसैनिक ऍड, शकील काझी, मुन्नाभाई शेख,भाऊसो अनंत निकम,रविंद्र पाटील, रफिक मिस्तरी, लतीफ दादा, फिरोज मिस्तरी,ऍड. रजाक शेख,अजहर भाई सैय्यद,शिवसेना निरीक्षक कारभारी आहेर, देवेंद्र देशमुख, मोहन भोई,आम आदमी पार्टी चे प्रा. गणेश पवार व कार्यकर्ते, प्रा. पंकज पाटील, हिम्मत पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.