जळगाव – तालुक्यातील चिंचोली येथील गिरीजा भवानी यात्रोत्सवाला महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजयजी सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भवानी मातेचे दर्शन घेवून विजयासाठी साकडे घातले.
करणदादा पवार आणि संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी जय भवानी, जय शिवाजी, करणदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर त्यांच्याहस्ते बारागाड्यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, उपतालुका प्रमुख विजय लाड, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद चौधरी, महानगराध्यक्ष योगेश हिवरकर यांसह घटक पक्षांचे पदाधिकारी, उपस्थित होते.