जळगाव – करणदादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत.आम्ही तुमच्यासोबत ठाम आणि आमचं ठरलं असल्याने लवकरच नियोजन करून बैठकांचे सत्र सुरू करू, असे आश्वासन लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी मविआचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांना दिले.
लोकसभेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून करणदादा पाटील-पवार हे विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शनिवार दि. २० रोजी करणदादा पाटील-पवार यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांची भेट घेतली. यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी करणदादांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
माजी खासदार उन्मेषदादा पाटील आणि करणदादा पाटील यांच्यामुळे पक्षात नवीन आणि युवा नेतृत्व आलं आहे. करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी लवकरच मतदार संघात दौरे करु नियोजन करून बैठका घेवू असे, आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


